महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

म्हाडाच्या गृहसाठा धोरणाबाबत गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये नाराजी!

सर्वसामान्यांचे स्वस्त घराचे स्वप्न पूर्ण करण्यात म्हाडा कमी पडू लागली आहे. गेल्या काही वर्षांत सोडतीतील घरांची संख्येमध्ये मोठया प्रमाणात घट झाली आहे.

mahada
म्हाडा

By

Published : Jan 29, 2020, 3:05 AM IST

मुंबई- सर्वसामान्यांचे स्वस्त घराचे स्वप्न पूर्ण करण्यात म्हाडा कमी पडू लागली आहे. गेल्या काही वर्षांत सोडतीतील घरांची संख्येमध्ये मोठया प्रमाणात घट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडा ५६ वसाहतींच्या पुनर्विकास योजनेतील विकासकांकडून प्रीमियमऐवजी पुन्हा गृहसाठा घेण्याची शक्यता आहे. पुनर्विकासात प्रीमियमऐवजी गृहसाठा घेण्याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच मत मांडले. मात्र, याबाबत गृहनिर्माण सहकारी संस्थेने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

म्हाडाच्या गृहसाठा धोरणाबाबत गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये नाराजी!

हेही वाचा -मुंबईमध्ये ओवेसींच्या सभेपूर्वी 'दुर्गावाहिनी'च्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

प्रीमियमच्या जागी पुन्हा गृहसाठा प्रस्ताव आणल्यास पुन्हा विकासक पाठ फिरवू शकतो, अशी भीती गृहनिर्माण संस्थेमध्ये आहे. सर्वाना घरे मिळावी या मताचे आम्ही आहोत. मात्र, गृहसाठा पुन्हा सुरू केल्यास पुनर्विकास रखडू शकतो. तसेच विकासक पाठ फिरवू शकतो. म्हाडानी याविषयी 56 वसाहतीच्या समितीना एकत्र बोलवत एक बैठक घेतली पाहिजे. यातून काहीतरी मार्ग काढता येईल, असे कन्नमवार नगर कॉओपरिव्ह हौसिंग सोसायटी असोसिएशचे जयंत दांडेकर यांनी सांगितले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहसाठ्याबाबत काही दिवसांपूर्वी मत मांडले होते. मात्र अजून याबाबत काही शासननिर्णय झालेला नाही. मात्र असे झाल्यास पुनर्विकासाला खिळ बसू शकते. निर्णय घेण्याआधी म्हाडाने सुरुवातीला गृहनिर्माण संस्थेबरोबर चर्चा केली पाहिजे. नेमकं किती क्षेत्रपळ असलेल्या जागेला किती गृहसाठा द्यावा लागेल हेही कळाले पाहिजे, असे शैलेंद्र नगर गृह निर्माण हौसिंग सोसायटी असोसिएशनचे अविनाश नरवाडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details