मुंबई - नागपुरात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन(Maharashtra Winter Session 2021) संदर्भात अजूनही टांगती तलवारच आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात ७ डिसेंबरला होईल याची घोषणा आधीच झाली आहे. आता हे अधिवेशन महिनाभर पुढे ढकलणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत?(Winter Session Mumbai or Nagpur) यासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. हे अधिवेशन नागपुरातच घेणार असल्याची आग्रही भूमिका काँग्रेसने घेतली असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress State President Nana Patole) यांनी सांगितले आहे. तर हे अधिवेशन मुंबईत घ्यावे अशी भूमिका शिवसेनेने(Shivsena) घेतली आहे. त्यामुळे यावरून महाविकास आघाडीमध्ये मतमत्तांतरं दिसून येत आहेत.
- अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत विदर्भातले मंत्री, आमदार आक्रमक -
अधिवेशन संदर्भात प्रशासकीय बैठका सुरू आहेत. मात्र, प्रशासन यासंदर्भात निर्णय झाल्यावरच तयारीला गती देण्याच्या मन:स्थितीत दिसून येत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, कोविड संक्रमणाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता अधिवेशन मुंबईतच व्हावे, या विचाराचे बहुतांश अधिकारी व मंत्री आहेत. तर विदर्भातील मंत्री व आमदार यांनी कुठल्याही परिस्थितीत अधिवेशन नागपुरातच व्हायला पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. तसा दबावही सरकारवर विदर्भातील नेत्यांनी व मंत्र्यांनी आणला आहे.
- अधिवेशन मुंबईत घेण्यासाठी शिवसेना आग्रही -