महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sawan Kumar Tak Passed Away ज्येष्ठ दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन, सलमान खानची भावूक पोस्ट - सावन कुमार टाक यांचं निधन

प्रसिद्ध दिग्दर्शक सावन कुमार टाक Sawan Kumar Tak passed away यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका heart attack आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात Kokilaben Hospital दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता सलमान खान salman khan Post यांनीही सावन कुमार टाक यांच्या सिनेमांमध्ये काम केले होते.

Sawan Kumar Tak
Sawan Kumar Tak

By

Published : Aug 25, 2022, 8:42 PM IST

Updated : Aug 26, 2022, 9:21 AM IST

मुंबई - सौतन, सनम बेवफासह विविध हिंदी सिमेनांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक सावन कुमार टाक Sawan Kumar Tak passed away यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका heart attack आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात Kokilaben Hospital दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता सलमान खान salman khan Post यांनीही सावन कुमार टाक यांच्या सिनेमांमध्ये काम केले होते. टाक यांचे निधन झाल्यानंतर भावूक पोस्ट लिहित सलमानने शोक व्यक्त केला आहे.

'हे' आहेत सावन कुमारांचे प्रसिद्ध चित्रपट : ७० ते ८० च्या दशकात सावन कुमार यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले होते. यात सनम बेवफा, बेवफा से वफा, हवस, सौतन, साजन बिन सुहागन, सौतन की बेटी, खलनायिका, माँ, सलमा पे दिल आ गया, सनम हरजाई, चांद का तुकडा यासारख्या अनेक चित्रपटाचा समावेश आहे. सावन कुमार यांचे बहुतांश चित्रपट हे महिलांवर आधारित असायचे. यासाठी त्यांना खास ओळखले जात होते.

'या' कलाकारांसोबत केले काम :सावन कुमार गेल्या ३० ते ४० वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत संजीव कुमार ते सलमान खान यासारख्या कलाकारांसोबत काम केले होते. सावन कुमार टाक यांचा नौनिहाल हा निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता. सावन कुमार टाक यांनी अभिनेत्री मीना कुमारीसोबतही काम केले होते. १९७२ यावर्षी प्रदर्शित झालेला गोमती के किनारे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. संजीव कुमार, राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा, सलमान खान यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते.

हेही वाचा -Sonali Phogat Case सोनाली फोगाटच्या मृतदेहावर आढळून आले जखमेचे निशाण, शवविच्छेदन अहवालात झाले स्पष्ट

Last Updated : Aug 26, 2022, 9:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details