मुंबई - प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपची त्यांच्या घरी ११ तास चौकशी केली आहे. या चौकशीनंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने अनुराग कश्यपचा लॅपटॉप व बँकेसंदर्भात दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दिग्दर्शक कश्यप यांच्या घरातून सायंकाळी ५ वाजता बाहेर पडले आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने फिल्म फँटमसंदर्भातही काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या तपासणी केली आहे. तर अभिनेत्री तापसी पन्नुच्या घरी व कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपासणीसाठी पोहोचले आहेत. प्राप्तिकर विभागाला तापसीच्या घरात महत्त्वाचे कागदपत्रे मिळाली आहेत. या कागदपत्राच्या आधारावर तापसीच्या श्री या कार्यालयात कारवाई करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबईसहित पुण्यातील २२ ठिकाणी छापे टाकले आहेत. मात्र, या तपासणीत प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागले, हे समोर येऊ शकले नाही.