महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dipali Sayyed slammed BJP : संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेतो, भाजपच्या मोठाभाईला माफी मागायला सांगा- दिपाली सय्यद - दिपाली सय्यद अमित शाह टीका

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. देश नही झुकने दुंगा विसरलात का? भाजपच्या मोठाभाईला माफी मागायला ( Dipali Sayyed on Amit Shah ) सांगा तुमच्या पापात देश सहभागी होणार ( ( Dipali Sayyed on Aurangabad name change ) नाही.

Dipali Sayyed
दिपाली सय्यद

By

Published : Jun 9, 2022, 5:52 PM IST

Updated : Jun 9, 2022, 6:15 PM IST

मुंबई- शिवसेनेच्या नेत्या तथा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपवर कडाडून ( Dipali Sayyed slammed BJP ) टीका केली आहे.संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेत आहोत. पण नुपूर शर्मा मुळे देशाचे नाव खराब होता कामा नये, अशी त्यांनी ( Dipali Sayyed on Nupur Sharma ) भाजपवर टीका केली आहे.

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. देश नही झुकने दुंगा विसरलात का? भाजपच्या मोठाभाईला माफी मागायला ( Dipali Sayyed on Amit Shah ) सांगा तुमच्या पापात देश सहभागी होणार ( Dipali Sayyed on Aurangabad name change ) नाही.

दिपाली सय्यद यांनी भाजपला दिले आव्हान-दिपाली सय्यद यापूर्वीही भाजपवर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, तुम्ही काय माझ्या घरात घुसणार, तुमच्यात तेवढी ताकत आहे का?. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपाचे अनेक नेते आक्षेपार्ह बोलतात. त्याची सुरुवात कोणी केली?, आधी भाजपा नेत्यांच्या घरात घुसला पाहिजे. पंतप्रधान भाजपासाठी सर्वोच्च मग मुख्यमंत्री कोणी नाहीत का?, असा सवालही दिपाली सय्यद यांनी भाजपाला विचारला होता.

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, ही मागणी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. मध्यंतरी शासन स्तरावरही विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली सुरू केल्या होत्या. प्रत्यक्षात शहराचे नाव बदलण्यात आले नसल्याने भाजपकडून शिवसेनेवर सातत्याने टीका होते.

हेही वाचा-Dipali Sayyed Criticized Amruta Fadnavis : 'फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा...'

हेही वाचा-Dipali Sayyed : "तुम्ही काय माझ्या घरात घुसणार, तुमच्यात..."; दिपाली सय्यद यांचे भाजपाला आव्हान

Last Updated : Jun 9, 2022, 6:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details