मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यानंतर भाजपाकडून दिपाली सय्यद यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिपाली सय्यद यांना आडवलं नाही, तर त्यांच्या घरात घुसून त्यांना बदडून काढू, असा इशारा भाजपा महिला मोर्चाकडून देण्यात आला होता. त्यानंतर आता दिपाली सय्यद यांनी भाजपाला प्रत्यत्तुर दिले ( Dipali Sayyed challenge bjp ) आहे. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार, तुमच्यात तेवढी ताकत आहे का?, असे आव्हान दिपाली सय्यद यांनी भाजपाला दिले आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद होत्या.
दिपाली सय्यद म्हणाल्या की, तुम्ही काय माझ्या घरात घुसणार, तुमच्यात तेवढी ताकत आहे का?. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपाचे अनेक नेते आक्षेपार्ह बोलतात. त्याची सुरुवात कोणी केली?, आधी भाजपा नेत्यांच्या घरात घुसला पाहिजे. पंतप्रधान भाजपासाठी सर्वोच्च मग मुख्यमंत्री कोणी नाहीत का?, असा सवालही दिपाली सय्यद यांनी भाजपाला विचारला आहे.