मुंबई- कोकणात गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आणि खासदार नारायण राणे यांच्यातले शाब्दिक युद्ध सुरूच आहे. राणे यांना भाजपात घेऊन कशाला दुधात मिठाचा खडा टाकलाय, अशी खोचक टीका केसरकरांनी केली आहे. तर खासदार आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपात विलीन करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत शिवसेनेत तसेच भाजपात उलट सुलट चर्चेला उधाण आले असून शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी थेट राणे यांच्यावर टीका केली आहे.
नारायण राणे यांना भाजपात घेऊन कशाला मिठाचा खडा टाकताय; दीपक केसरकर यांची खोचक टीका
राणे यांना भाजपात घेऊन कशाला दुधात मिठाचा खडा टाकलाय, अशी खोचक टीका राज्याचे गृहराज्यमंत्री केसरकरांनी केली आहे. नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपात विलीन करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत शिवसेनेत तसेच भाजपात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
गृहराज्यमंत्री केसरकर
एकीकडे शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला. तर दुसरीकडे राणे यांना भाजपात घेऊन हे संबंध दोन्ही पक्षाने बिघडवू नयेत, असे केसरकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत राणे यांनी महायुतीच्या विरोधात सिंधुदुर्ग मतदारसंघात निवडणूक लढवली. याचाही विचार व्हायला हवा, अशी मागणीच केसरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आम्ही राणे यांच्या विरोधात लढा देत आहोत, यापुढे ही लढा देऊ असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.