महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kangana Ranaut defamation case : अभिनेत्री कंगना राणौतचे आरोप काल्पनिक आणि तर्कसंगत नाहीत- दिंडोशी सत्र न्यायालय - जावेद अख्तर मानहानी खटला

अभिनेत्री कंगना राणौत विरोधात ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर ( case Against Kangana Ranaut ) यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातील याचिका इतर कोर्टामध्ये सुनावणी स्थानांतरित करण्यासाठी अभिनेत्री कंगना राणौत दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज ( Dindoshi court on Kangana Ranaut case ) केला होता. हा अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने 9 मार्च रोजी फेटाळून लावला होता. यावर सत्र न्यायालयाचा सविस्तर निकाल समोर आला आहे.

जावेद अख्तर कंगना रणौत
जावेद अख्तर कंगना रणौत

By

Published : Mar 19, 2022, 5:29 PM IST

मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर ( Javed Akhatr case Against Kangana Ranaut ) यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला दुसऱ्या न्यायालयात सुनावणी करण्यासाची कंगनाची माणी दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही मागणी फेटाळताना न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदविले आहेत.

अभिनेत्री कंगना राणौत विरोधात ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर ( case Against Kangana Ranaut ) यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातील याचिका इतर कोर्टामध्ये सुनावणी स्थानांतरित करण्यासाठी अभिनेत्री कंगना राणौत दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज ( Dindoshi court on Kangana Ranaut case ) केला होता. हा अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने 9 मार्च रोजी फेटाळून लावला होता. यावर सत्र न्यायालयाचा सविस्तर निकाल समोर आला आहे.

दिंडोशी सत्र न्यायालयाने असे म्हटले आहे की खटला योग्य व निष्पक्षपणे चालविला जाणार नाही, ही भीती वाजवी व अनुमानावर आधारित असली पाहिजे. खटला दुसरीकडे चालविण्याची मागणी काल्पनिक आणि तर्कहीन नसावी, असे सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.

हेही वाचा-Imtiaz Jalil : इम्तियाज जलील माझे वर्गमित्र मात्र, एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : राजेश टोपे

योग्य व निष्पक्ष न्याय देणे हा गुन्हेगारी खटल्यांचा हेतू
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दावा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून अन्य न्यायालयात वर्ग करण्याचा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने म्हटले की बाह्य विचारांनी प्रभावित न होता योग्य व निष्पक्ष न्याय देणे हा गुन्हेगारी खटल्यांचा हेतू आहे. जेव्हा लोकांचा खटल्याच्या निष्पक्षतेवर विश्वासकमी होईल तेव्हा कोणताही पक्ष खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी करू शकतो. एखादे न्यायालय फौजदारी न्याय नि:ष्पक्षपणे किंवा वस्तुनिष्ठपणे करू शकत नसल्याचे दिसून आले तर तो खटला वर्ग केला जाऊ शकतो.

हेही वाचा-Kolhapur North Bypoll : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रणधुमाळी; काँग्रेस जागा टिकवणार की भाजप झेंडा फडकवणार?

भीतीमुळे खटला वर्ग केला जाऊ शकत नाही
सदर प्रकरणी न्याय मिळणार नाही या केवळ भीतीमुळे खटला वर्ग केला जाऊ शकत नाही. कोणताही पक्षपातीपणा न करता न्याय मिळणार नाही अशी भीती दाखविणारी सामग्री नसताना खटला वर्ग करण्याचा अर्ज मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने कंगनाचा अर्ज फेटाळताना म्हटले आहे. खटला वर्ग करण्यासंदर्भात एकामागून एक अर्ज करण्यात आले. त्या अर्जांवर दंडाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला नाही. तसेच कंगनाला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले म्हणून संबंधित दंडाधिकारी पक्षपातीपणा करत होते असे म्हणता येणार नाही असेही न्यायालयाने म्हटले.

हेही वाचा-राधिकाच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे.. फौजदार बनलेल्या राधिकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी..

काय म्हटले होते कंगनाने?
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.


काय आहे प्रकरण?
कंगनाने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहीन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे.

वारंवार नोटीस देऊनही कंगना गैरहजर

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिन्याच्या संपादकाने घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details