मुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात ( Dindoshi court ) समीर वानखडे ( Sameer Wankhade ) आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर ( Kranti Redkar ) यांच्या याचिकेवरील निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. वानखेडे कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणे थांबविण्याकरिता आणि पूर्वी केलेल्या पोस्ट डिलीट करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
सोशल मीडियावरील पोस्ट हटविण्याकरिता ( Petition against social media in court ) गुगल, फेसबुक आणि ट्विटर याविरोधात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिंडोशी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाकडून 7 फेब्रुवारीला निकाल देण्यात येणार आहे.
हेही वाचा-अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर पुणे पोलिसांच्या अभिलेखावर वेगळाच गुन्हा..?
क्रांती रेडकर यांनी याचिकेत काय म्हटले?
क्रांती रेडकरयांच्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून वानखडे कुटुंबीयांवर खालच्या पातळीत भाषा करणाऱ्या पोस्ट गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांनी थांबवण्यात यावे. त्या पोस्ट काढून टाकाव्यात असा आदेश या सर्व सोशल मीडियाला देण्यात यावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाला वानखडे कुटुंबाकडून विनंतीदेखील करण्यात आली आहे.
हेही वाचा-मलिक यांनी ट्विट केलेले 'ते' Whats App चॅट्स बनावट; क्रांती रेडकर यांची पोलिसात ऑनलाइन तक्रार
हेही वाचा-क्रांती रेडकरची दिंडोशी न्यायालयात सोशल मीडियाविरोधात याचिका, 17 डिसेंबरला सुनावणी