महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेत्री कंगना रणौतच्या दोन याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळल्या - kangana ranaut petition reject

अभिनेत्री कंगना रणौतच्या दोन्ही याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळल्या आहेत. कंगना रणौतने बॉलीवूड गीतकार जावेद अख्तर यांच्याशी संबंधित खटले अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातून अन्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारे दोन अर्ज दाखल केले होते.

kangana ranaut javed akhtar
जावेद अख्तर कंगना रणौत फाईल फोटो

By

Published : Mar 9, 2022, 2:39 PM IST

Updated : Mar 9, 2022, 5:07 PM IST

मुंबई -अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विरोधात ज्येष्ठ पटकथा लेखक कवी जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातील याचिका इतर कोर्टामध्ये सुनावणी स्थानांतरित करण्यासाठी अभिनेत्री कंगना राणौत दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तसेच कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता, की अभिनेता रितिक रोशन प्रकरणात जावेद अख्तर याने धमकी दिली असल्याची तक्रार केली होती. या दोन्ही याचिका आज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे कंगना रणौत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कंगना रणौत यांनी केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. याआधी देखील किल्ला कोर्टाने कंगनाने जावेद अख्तर मानहानी प्रकरणाची सुनावणी इतर कोर्टात स्थानांतरित करण्याची मागणी फेटाळली होती. त्यामुळे कंगानाने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिंडोशी सत्र न्यायालयाकडूनही कंगनाला काही दिलासा मिळालेला नाही.

कंगना विरोधात गीतकार जावेद अख्तर ह्यानी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल केली आहे. मानहानि याचिका सदर प्रकरणाची सुनावणी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टा समोर न करता इतर कोर्टात स्थानांतरित करण्यात यावी यासाठी कंगनाने सेशन कोर्टात धाव घेतली होती. या दोन्ही याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळल्याने कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती. तेव्हाच गीतकार जावेद अख्तर यांच्याविषयी कंगनाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाने माझी विनाकारण मानहानी केली आणि त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असा आरोप जावेद अख्तर यांनी कंगनावर केला. त्यानंतर अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे कंगनावर फौजदारी खटला चालवावा अशी मागणी करण्यात आली आणि त्यानंतर न्यायालयाने १ मार्च रोजी कंगनाला वॉरंट जारी केली. मागील ८-९ महिन्यांपासून हा खटला प्रलंबित आहे.

मी सतत शुटींगनिमित्ताने बाहेर असते. त्यामुळे मला सतत सुनावणीसाठी मुंबईत येता येणार नाही म्हणून याप्रकरणातील इतर सुनावणी स्थानांतरित करण्यासाठी कंगनाने मागणी केली. मात्र, दोन्ही वेळेस कंगनाची मागणी फेटाळण्यात आली.

काय आहे प्रकरण

कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहिन आणि बोगस आहेत असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

काय म्हटले होते कंगनाने?

कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

Last Updated : Mar 9, 2022, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details