मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे मुलगा आमदार नितेश राणे यांना दिशा सालियनच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास नोटीस बजावली होती. (BJP MLA Nitesh Rane) मात्र, नारायण राणे यांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अधिक वेळ मागून घेतला आहे. (Disha Salian case) त्यानंतर नारायण राणे आणि मुलगा नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. (Fir Against Narayan rane) त्या अर्जावर आज न्यायालयाने सुनावणी घेत पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसचे, 10 मार्चपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली
दिशा सालियनची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी अशी विनंती सालियान कुटुंबियांनी वारंवार केल्यानंतरही केंद्रिय लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टिका करत होते. (Rane father and son Case) दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली ती गरोदर होती असा नारायण राणेंचा दावा होता.
राज्य महिला आयोगाकडे तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियनप्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याची सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधा गुन्हा दाखल करून घेतला होता.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार
मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशाच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार दिशाची आई वसंती आणि वडील सतीश सालियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली. यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यवाही अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.