महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Drug Smugglers Arrest : गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या 4 तस्करांना दिंडोशी पोलिसांकडून अटक - Drug Smugglers Arrest

दिंडोशी पोलिसांनी 4 ऑटो रिक्षा ड्रायव्हरला ड्रग्ससह ( Dindoshi police arrest drug peddler ) अटक केली आहे. ते रिक्षा चालविण्याच्या आड ड्रग्सची तस्करी ( Drug smuggling case in Mumbai ) करीत होते. ही गँग घाटकोपर भागातून ड्रग्स घेऊन गोरेगाव फिल्म सिटीमध्ये पुरवठा करीत ( Drug supply in goregaon Film city ) होती. पोलिसांनी घटनास्थळाहून गांजा जप्त केला आहे.

By

Published : Mar 28, 2022, 9:16 PM IST

Updated : Mar 28, 2022, 10:15 PM IST

मुंबई-घाटकोपर परिसरातील ड्रग्सची तस्करी करणारी गँग दिंडोशी पोलिसांनी गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ड्रग्सचा पुरवठा करत होते. या गँगमधील चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. हुसैन कुरैशी (38), अब्दुल रज्जाक मो. रफीक शेख (31), सलीम आजम शेख( 24), मो.अली निजामुद्दीन खान (24) यांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण घाटकोपर भागात राहणारे आहेत.

पोलिसांनी ड्रग पेडलर्सला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. याशिवाय फिल्म सिटीमध्ये कोणाला ड्रग्स सप्लाय केला जातो याचाही शोध पोलीस घेत आहेत.

चार आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल
दिंडोशी पोलिसांनी 4 ऑटो रिक्षा ड्रायव्हरला ड्रग्ससह ( Dindoshi police arrest drug peddler ) अटक केली आहे. ते रिक्षा चालविण्याच्या आड ड्रग्सची तस्करी (Drug smuggling case in Mumbai ) करीत होते. ही गँग घाटकोपर भागातून ड्रग्स घेऊन गोरेगाव फिल्म सिटीमध्ये पुरवठा करीत ( Drug supply in goregaon Film city ) होती. पोलिसांनी घटनास्थळाहून गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी एक ऑटो रिक्षा जप्त केली आहे. या प्रकरणात चार आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

हेही वाचा-Maharashtra Ministers : महाराष्ट्रातील 'या' तीन मंत्र्यांवर गुन्हे दाखल

रिक्षा जप्त

दिंडोशी डिव्हीजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटीलची टीम गस्त घालत होती. यादरम्यान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्वामी नारायण मंदिर मालाड पूर्वेजवळ निर्जंन ठिकाणी काही संशयास्पद रिक्षा दिसल्या. पोलीस जेव्हा टीम घेऊन रिक्षाची चौकशी करायला पुढे गेले. तेव्हा चालक रिक्षा घेऊन पळू लागले. यानंतर पोलिसांच्या टीमने रिक्षाचा पाठलाग गेला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तर रिक्षात गांजा सापडला. पोलिसांनी सर्व 4 आरोपींना अटक करून रिक्षा जप्त केली आहे.

हेही वाचा-Chandrakant Patil Criticized CM : भाग्यवान माणूस जन्माला आला; चंद्रकांत पाटलांनी वाचली मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली

Last Updated : Mar 28, 2022, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details