मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध अॅमेझॉन हा वाद आता नवीन वळणावर येऊन पोहचला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज यांना 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज यांच्याबरोबर मनसे सचिव यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा -20 एकरातील पारंपरिक पिकाला, 2 एकरातील पेरू भारी!
मराठीच्या सन्मानासाठी कोणतीही केसेस अंगावर घेण्याची आमची तयारी
अॅमेझॉनला महाराष्ट्रात आणि मुंबईत मोठा व्यवसाय आहे. हे त्यांनी विसरू नये. अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे. खटले दाखल करण्याची सुरुवात त्यांनी केली. १९ नोव्हेंबरला माझ्याविरोधात केस टाकण्यात आली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याली. या नोटिशीची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. अशा या नोटीसला आम्ही फार किंमत देणार नाही आहे. मराठीच्या सन्मानासाठी कोणतीही केसेस अंगावर घेण्याची तयारी आमची आहे अशा थेट इशारा मनसे नेते अखिल चित्रे यांनी अमेझॉनला दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
अॅमेझॉन या इ कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा अशी मागणी मनसेने केली आहे. मात्र, कंपनीने हे अशक्य असल्याचे सांगितल्याने मनसे विरुद्ध अॅमेझॉन अशी लढाई सुरू झाली आहे. मनसेने देखील आक्रमक होत मराठी नाही तर अॅमेझॉन नाही अशी मोहीम सुरू केली आहे. जिथपर्यत अॅमेझॉन मराठी भाषेचा समावेश अॅपमध्ये करत नाही तोपर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाचा माज जिथपर्यत उतरेल तिथपर्यंत ही मनसेची मोहीम सुरू राहील, असेही या अगोदर मनसे नेते अखिल चित्रे यांनी सांगितले.
हेही वाचा -विशेष : वाहन खरेदीत पुणेकर ठरले देशात अव्वल; जाणून घ्या वर्षभरात किती झाली वाहनांची विक्री