मुंबई -भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Tweet On Sharad Pawar ) यांनी एका मागोमाग एक 14 ट्विट करत गेल्या काही वर्षातल्या शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अटक झालेले मंत्री नवाब मलिक मुस्लीम ( Nawab Malik Connection With Dawood ) असल्यामुळे त्यांचा संबंध दाऊदची जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनी केलं होतं. या आरोपांवर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे ( Dilip Walse Patil Replied To Devendra Fadnavis Alligation ) पाटील म्हणाले. '370 कलम बाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, शरद पवारांवर टीका करणे हा काहीजणांचा आवडता छंद असून, शरद पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका केली वर्षानुवर्ष लोकांना माहित आहेत. त्यामुळे असे ट्विट करून देवेंद्र फडणीस यांना कोणताही फायदा होणार नाही, असा चिमटा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणीस यांना काढला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी चिमटा काढला.
'याआधीही भाजपाकडून प्रयत्न' -पीएमएलए कायदा येण्याअगोदर नवाब मलिक यांची केस आहे. या प्रकरणात दाऊदशी कोणताही व्यवहार केला गेलेला नाही. मात्र, तरीही ओढून ताणून संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशाच प्रकारे शरद पवार यांच्यावर देखील दाऊद इब्राहिमशी संबंध ठेवल्याचा आरोप याआधी भारतीय जनता पक्षाने केला होता, याची आठवण गृहमंत्र्यांनी यावेळी करून दिली.
मुस्लीम शैक्षणिक आरक्षणाचं काय झाल? -संविधानात धर्मानुसार आरक्षण देता येत नाही, असे स्पष्ट असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच मुस्लीम आरक्षणाचा पुरस्कार केला, असा आरोपही ट्विट मधून देवेंद्र फडणीस यांनी केला होता. त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, 'मुस्लिमांना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शैक्षणिक आरक्षण नाही नाकारलं याचं उत्तर आधी द्या.'