महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Worker Agitation At Silver Oak : 'एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत, योग्य ती कारवाई केली जाईल' - undefined

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( ST Worker Agitation At Silver Oak ) यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil PC After Silver Oak Attack ) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने निर्णयाचे स्वागत केल्यानंतर असा हल्ला होणं म्हणजे कोणीतरी एसटी कर्मचाऱ्यांना ( Dilip Walse Patil Reaction ST Worker Agitation ) भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ST Worker Agitation At Silver Oak
ST Worker Agitation At Silver Oak

By

Published : Apr 8, 2022, 5:26 PM IST

मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( ST Worker Agitation At Silver Oak ) यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil PC After Silver Oak Attack ) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने निर्णयाचे स्वागत केल्यानंतर असा हल्ला होणं म्हणजे कोणीतरी एसटी कर्मचाऱ्यांना ( Dilip Walse Patil Reaction ST Worker Agitation ) भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले गृहमंत्री? -शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अतिशय दुर्देवी आहे. ही निश्चितच काळजी वाटावी, अशी घटना आहे. हल्ला झाला त्यावेळी महिला आंदोलक अधिक असल्याने पोलिसांना त्यांना अडवता आले नाही. आम्ही सकाळ पासून क्राईम कॉन्फरन्समध्ये व्यस्त होतो. त्यमुळे फेल्युअर कुठे झाले, हे शोधून काढू. तसेच आयबी (IB) ला याबाबत कसे कळले नाही, याची माहिती घेऊ, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले, एस टी कामगारांच्या प्रश्नांच्या अडून काही राजकीय शक्ती हे घडवत आहेत. हे आंदोलक कोण होते. खरेच आंदोलक होते का, हे तपासातून समोर येईलच. ज्या चुका झाल्यात त्या तपासल्या जातील, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहनही केले.

ट्वीट करूनही दिली प्रतिक्रिया -पत्रकार परिषदेपूर्वी गृहमंत्र्यांनी ट्वीट करत, या हल्ल्याचा निषेध नोंदवला. 'एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन करतो, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

हेही वाचा -Power Crisis In State : राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घेऊ - नितीन राऊत

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details