मुंबई :दिलीप कुमार यांना 1998 मध्ये पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’ मिळाल्यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याला कडाडून विरोध केला होता. या मुद्द्यावरून तेव्हा मोठा गदारोळ बघायला मिळाला होता.
पाकिस्तानच्या पुरस्कारावरून काय झाला होता वाद?
1998 मध्ये पाकिस्तानने दिलीप कुमार यांना 'निशान-ए-इम्तियाज' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. यानंतर दुसऱ्याच वर्षी 1999 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान कारगिल युद्ध झाले. यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान परत करावा अशी मागणी करत त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र कुमार यांनी याला नकार दिला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी कुमार यांचा पुरस्कार कायम ठेवत त्यांच्या देशभक्तीवर शंका घेण्याची काही गरज नसल्याचे परखडपणे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते.
शिवसैनिकांनी केले होते अंडरविअर आंदोलन