मुंबई - कोरोनानंतर लोकल प्रवासी संख्या वाढली आहे, त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवरील लांब रांगेपासून वाचण्यासाठी डिजिटल तिकिटांकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे, यूटीएस मोबाईल ॲपद्वारे मुंबई उपनगरीय प्रवासाची तिकिटे/सीझन तिकिटांच्या खरेदीत सातत्याने वाढ होत आहे.
हेही वाचा -Nupur Sharma on Prophet Muhammad : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात गुन्हा दाखल, प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप
९.४५ टक्क्यांनी वाढली डिजिटल तिकीट विक्री -गेली दोन वर्षेकोरोना आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरात बंदिस्त होती. कोरोना कमी झाल्यानंतर जीवन पूर्वपदावर आले आहे. रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. आता सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट खिडकीवरील (बुकिंग ऑफिसमधील) गर्दी कमी करण्याची गरज यामुळे रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. कोविड -19 महामारीच्या काळात उपनगरीय तिकिटे खरेदी करण्यासाठी यूटीएस मोबाइल ॲप प्रवाशांसाठी पुन्हा उघडण्यात आले होते, तेव्हापासून यूटीएस मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
या महिन्यात केवळ २६ मे २०२२ पर्यंत १४ लाख २० हजार तिकिटे मोबाईल ॲपद्वारे बुक करण्यात आली आहेत आणि एकूण ७८ लाख १३ हजार प्रवाशांनी यूटीएस मोबाईल ॲपद्वारे डिजिटल तिकिटांसह मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास केला, जे दररोज सरासरी प्रत्येक दिवसाला ५४ हजार ६३५ तिकिटे आणि ३ लाख ५२१ प्रवासी दर्शविते. मार्च २०२२ मध्ये प्री-कोविड, एकूण १२ लाख ७९ हजार ९५ यूटीएस मोबाइल लोकल ट्रेनची तिकिटे बुक करण्यात आली होती. तर, गेल्या महिन्यात एप्रिल २०२२ मध्ये यूटीएस मोबाइल ॲपद्वारे बुक केलेली उपनगरीय तिकिटे १४ लाख ६० होती, जी ९.४५ टक्के ची वाढ दर्शविते. एप्रिल २०२२ मध्ये यूटीएस मोबाइल ॲपद्वारे उपनगरीय तिकिटे खरेदी करण्याची टक्केवारी यूटीएस काउंटर तिकीट, एटीव्हीएम, जेटीबीएस इत्यादी इतर तिकीट प्रकारांपेक्षा ५.७९ टक्के आहे.
महिना/वर्ष
मोबाईल ॲपद्वारे तिकिटांची संख्या
मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांची संख्या
डिसेंबर २०२१
तिकीट- ५,९३,३८३
प्रवासी- ३३,९०,१९८
जानेवारी २०२२
तिकीट- ६,६३,५३३
प्रवासी- ३७,१४,५८३
फेब्रुवारी २०२२
तिकीट- ९,५२,३५७
प्रवासी- ५२,३६,९५७
मार्च २०२२
तिकीट- ११,२८,१३३
प्रवासी - ६७,२३,५४१
एप्रिल २०२२
तिकीट- १४,००,०६०
प्रवासी- ७४,३९,१७६
मे २०२२ (२६ पर्यंत)
तिकीट- १४,२०,५०६
प्रवासी- ७८,१३,५५३
प्रवाशांच्या वेळेची बचत - यूटीएस मोबाइल ॲपद्वारे उपनगरीय तिकीटांच्या खरेदीमध्ये कोविडनंतरच्या सहा महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. कारण यामुळे प्रवाशांना पेपरलेस व्यवहार करण्यास मदत होते, वेळेची बचत होते आणि स्मार्ट फोनसारख्या गॅजेटच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा एक हरीत पर्याय आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांसाठी यूटीएस मोबाइल तिकीट, रांगेशिवाय मौल्यवान वेळेची बचत, कोणत्याही त्रासाशिवाय तिकीट बुकिंग, मोबाईल तिकीटावर उपलब्ध पेपरलेस आणि प्रिंट आउट, असे दोन्ही पर्याय भविष्यासाठी एक सुखद अनुभव असेल.
हेही वाचा -Kirit Somaiya on anil parab : अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, किरीट सोमैया यांची मागणी