महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सामाजिक न्याय विभागातील वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदे भरणार - धनंजय मुंडे - dhananjay munde

विभागातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर विभागातील कर्मचाऱ्यांनी नियोजित लेखणी बंद आंदोलन स्थगित केले.

सामाजिक न्याय विभागातील वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदे भरणार - धनंजय मुंडे
सामाजिक न्याय विभागातील वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदे भरणार - धनंजय मुंडे

By

Published : Feb 1, 2021, 7:56 AM IST

परळी वैजनाथ /मुंबई -सामाजिक न्याय विभागातील वर्ग 3 आणि वर्ग 4 ची रिक्त पदे भरण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यानंतर विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन मागे घेणार असल्याचे सांगितले.

विभागातील वर्ग 3 ची 1441 आणि वर्ग 4 ची 1584 रिक्त पदे भरण्याबाबत वित्त विभागाचे असलेले निर्बंध उठताच ही पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. या पदभरतीसह आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत मुंडेंनी आंदोलनापूर्वीच विविध कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले. अनेक मागण्यांबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले नियोजित लेखणीबंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे.

समाज कल्याण विभागातील निलंबित 8 कर्मचाऱ्यांना पुनर्स्थापित करण्यात आले असून उर्वरित कर्मचाऱ्यांचा प्रकरणनिहाय आढावा घ्यावा तसेच रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले. पदोन्नतीबाबतही लवकर बैठक आयोजित करण्याबाबत तसेच विभागीय परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे निर्देशही मुंडेंनी दिले. शासकीय वसतीगृहात कंत्राटी पदे न भरण्याबाबत फेर आढावा घेऊन प्रस्ताव सादर करावा, शासकीय निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी याविषयीही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीस संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष शांताराम शिंदे, कृती समिती अध्यक्ष राजेंद्र देवरे, उपाध्यक्ष राजेंद्र भुजाडे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सचिव सुजित भांबुरे, सचिव भरत राऊत, कार्यकारणी सदस्य सर्वश्री भूषण शेळके, विठ्ठल राव धसाडे, प्रफुल्ल गोहते, डॉक्टर त्रिवेणी लोहार, शासकीय निवासी शाळा प्रतिनिधी विष्णू दराडे, शिवराज गायकवाड हे उपस्थित होते.

हेही वाचा -पहिल्यांदाच अर्थसंकल्प असणार डिजीटल स्वरुपात; ब्रीफकेसची परंपरा मोडीत

ABOUT THE AUTHOR

...view details