महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून धनंजय मुंडेंनी स्वीकारला खात्याचा पदभार

चैत्यभूमीवरील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्मारकाला अभिवादन करत, मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला.

Dhananjay Munde took charge
धनंजय मुंडे यांनी खात्याचा पदभार स्वीकारला

By

Published : Jan 6, 2020, 8:49 PM IST

मुंबई -राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन केले.

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात जात, धनंजय मुंडेंनी स्विकारला खात्याचा पदभार...

हेही वाचा... अक्षम्य दुर्लक्षपणा.. शिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात आढळला जिवंत बेडूक

बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंच्या स्मारकाला दिली भेट...

खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी धनंजय मुंडेंनी चैत्यभूमीवरील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यानंतरच त्यांनी मंत्रालयाकडे प्रस्थान केले.

धनंजय मुंडेंनी खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंच्या स्मारकाला दिली भेट

हेही वाचा.... दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर.. 8 फेब्रुवारीला मतदान तर ११ फेब्रुवारीला निकाल

अन् मंत्रालयातील सहावा मजला माणसांच्या गर्दीने फुलून गेला....

सामाजिक न्याय खात्याचे नूतन मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात जात खात्याचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी खात्याची सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी पहिल्याच दिवशी कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्याने सहावा मजला माणसांच्या गर्दीने फुलून गेला होता.

धनंजय मुंडेंनी खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन केले...

हेही वाचा.... सरकारच्या धोरणांविरोधात १० संघटनांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप

ABOUT THE AUTHOR

...view details