मुंबई -सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना खंडणी ( Dhananjay Munde Extortion Case ) मागणाऱ्या आरोपी रेणू शर्माच्या जामीन अर्जावर आज ( 6 मे ) सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रेणू शर्माचा जामीन अर्ज फेटाळला ( Renuka Sharma Bail Rejected ) आहे. 20 एप्रिल रोजी रेणू शर्माला मुंबई पोलिसांनी इंदौरमधून अटक केले होते. सध्या रेणू शर्मा भायखळा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
रेणू शर्माच्या जामीन अर्जावर सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, रेणू शर्माच्यांवरील आरोप अत्यंत गंभीर असून, तपास सुरू आहे. त्यामुळे या टप्प्यावर जामीन मंजूर केल्यास तपासावर निश्चितपणे परिणाम होईल, असे कारण देत न्यायाधीशांनी जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे रेणू शर्मांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.