महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकाही प्रश्नाचे उत्तर न दिलेल्या मोदींची गिनीज बुकने नोंद घ्यावी - धनंजय मुंडे - record

एकाही प्रश्नाचे उत्तर न देणाऱ्या मोदींची गिनीज बुक रेकॉर्डवाल्यांनी आवर्जून नोंद घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले आहे.

उत्तर न दिलेल्या मोदींची गिनीज बुकात नोंद घ्यावी

By

Published : May 17, 2019, 9:08 PM IST

मुंबई - गेल्या ५ वर्षांपासून माध्यमाच्या पुढे जाऊन पत्रकार परिषद घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मोदी यांच्यावर एका ट्विटच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे.

एकाही प्रश्नाचे उत्तर न दिलेल्या मोदींची गिनीज बुकने नोंद घ्यावी

मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने त्यावर मुंडे यांनी खोचकपणे टीका करत त्यांचे अभिनंदन केले आहे. एकाही प्रश्नाचे उत्तर न देणाऱ्या मोदींची गिनीज बुक रेकॉर्डवाल्यांनी आवर्जून नोंद घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले आहे. मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ५ वर्षे तोंडात मूग गिळून गप्प बसलेल्या पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले. विशेष म्हणजे पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या शौर्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे हार्दिक अभिनंदन.

ABOUT THE AUTHOR

...view details