महाराष्ट्र

maharashtra

'परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ'; संजय पांडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By

Published : May 3, 2021, 12:51 PM IST

परमबीर सिंग यांच्यावर सचिन वाजे यांना पोलीस दलात सामावून घेतल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणाची चौकशी पांडे करीत आहेत.

संजय पांडे परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ
संजय पांडे परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ

मुंबई - पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्यात असमर्थता दर्शवली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली असमर्थता कळवली आहे. परमवीर सिंग यांच्यावर सचिन वाझे यांना पोलीस दलात सामावून घेतल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणाची चौकशी पांडे करीत आहेत.

परबीर यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप-

अँटिलिया येथील स्फोटक प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली होती. यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप लावले होते. याप्रकरणी सीबीआयने चौकशी दरम्यान अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले. सध्या त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

परमबीर यांची वाझे प्रकरणात चौकशी-

या सगळ्या प्रकरणात अँटिलिया बंगल्यासमोरील स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नियुक्ती तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून झाली होती, असा अहवाल मुंबई पोलिसांनी गृह विभागाला पाठवला होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे सोपवली होती.

पांडे यांच्या विरोधात परबीर न्यायालयात

मात्र काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती आणि अनिल देशमुख यांच्या विरोधातली तक्रार मागे घेण्यासाठी संजय पांडे दबाव टाकत असल्याचे याचिकेत म्हटले होते. या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस महासंचालक यांनी चौकशी करण्यास थेट असमर्थताच दर्शविली आहे. मात्र या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिलेला परमबीर यांच्या विरोधातील अहवाल, यातुन काय निष्पन्न होणार हे येणाऱ्या काळच स्पष्ट करेल.

परमबीर अडचणीतच, अकोल्यात गुन्हा दाखल

2013 मध्ये कल्याण मधील एका गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडून दबाव टाकला गेल्याचा आरोप बी आर घाडगे या पोलीस निरीक्षक यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी सांगितल्या प्रमाणे आपण काम केले नाही, म्हणून आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही बी आर घाडगे या पोलीस निरीक्षकाने केलेला आहे.

परमबीर सिंग यांच्या बरोबर इतर 32 जणांच्या विरोधातसुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बी आर घाडगे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये ते शेड्युल कास्ट जमाती मधून येत असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता असाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अकोला पोलीस ठाण्यात परमबी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details