महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परमबीर सिंह यांच्यासह २५ पोलीस अधिकारी होणार निलंबित? गृह विभागाकडे प्रस्ताव सादर - Parambir Singh news

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर २५ पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खंडणी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या अडचणीत आले आहेत.

Parambir Singh
परमबीर सिंह

By

Published : Sep 25, 2021, 7:13 PM IST

मुंबई -मुंबईसह ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झालेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर २५ पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे सादर केला आहे. गृह विभागाच्या मंजुरीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा -ओडिसात चक्रीवादळ धडकणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा; सात जिल्ह्यांत बचाव पथके तैनात

  • प्रस्ताव गृह विभागाकडे सादर -

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खंडणी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या अडचणीत आले आहेत. मुंबईत मरीन ड्राइव्ह, आंबोली, ठाण्यात ठाणे नगर, कोपरी आणि नौपाडा अशा एकूण 5 पोलीस ठाण्यात सिंह यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. सिंह यांच्यासह ठाणे, मुंबईतील पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अशांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून, गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

  • अधिकाऱ्यांच्या भूमिका तपासणार -

दोन आठवड्यापूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुंबई, ठाण्याबाहेर तसेच साईड ब्रँचला बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांमध्ये एक महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर तीन पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या प्रस्तावात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांच्या काय भूमिका आहेत? त्याचा सहभाग कुठपर्यंत आहे? याच्या तपासणीसाठी ही फाईल पुन्हा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. त्यानंतर गृह विभागाकडून योग्य भूमिका घेतली जाईल, असे गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -हवामान खात्याचा इशारा: उद्यापासून राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details