महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दुसऱ्या दिवशीही भाविकांची गर्दी - mumbai ganesh festival

बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून भाविक येत असून 5 किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशीही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

लालबागचा राजा

By

Published : Sep 3, 2019, 12:49 PM IST

मुंबई - लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबर राज्यात पावसालाही सुरुवात झाली आहे. मुंबईत देखील सोमवारपासून पाऊस पडत असला तरी देखील भर पावसात भाविक लालबाग व परेल येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

हेही वाचा - आज दुपारी समुद्राला मोठी भरती, विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी काळजी घ्यावी

बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून भाविक येत असून 5 किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशीही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. पहाटे आरतीच्या वेळेस दर्शन थांबविण्यात आले होते. आरती झाल्यानंतर पुन्हा दर्शन सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबई : यंदा गणपती सजावटीच्या साहित्य विक्रीत घट

दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. अनेक जण या राजाची एक झलक घेण्यासाठी आतूर असतात. यावर्षी लालबागच्या राजाच्या देखाव्यात चांद्रयान-२ आणि अंतराळवीर बघायला मिळत आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काही कलाकार मंडळींनी दर्शन घेतले. आज देखील सामान्य लोकांपासून ते राजकीय मंडळी, कलाकार मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा - येत्या निवडणुकीत 240 चा टप्पा पार करू, गिरीश महाजन यांचा विश्वास

ABOUT THE AUTHOR

...view details