मुंबई - नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. एकीकडे राजकीय घडामोडी ( Devendra fadnavis meet bjp leader in delhi ) सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा धावता दौरा ( Eknath shinde rebellion ) करून सरकार सत्तास्थापनेसाठी हालचाली ( Devendra fadnavis went delhi ) सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Devendra Fadnavis Went Delhi : देवेंद्र फडणवीसांचा धावता दिल्ली दौरा, राजकीय हालचाली वाढल्या - एकनाथ शिंदे बंडखोर
एकीकडे राजकीय घडामोडी ( Devendra fadnavis meet bjp leader in delhi ) सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा धावता दौरा ( Eknath shinde rebellion ) करून सरकार सत्तास्थापनेसाठी हालचाली ( Devendra fadnavis went delhi ) सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेत निर्माण झालेली बंडाळी संपुष्टात येण्याची शक्यता पूर्णपणे मावळल्याने राज्यात सत्ता संघर्ष तीव्र झाला आहे. महाविकास आघाडीकडून शिंदे गटाला निष्प्रभ करण्यासाठी शिवसेनेकडून सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. सत्तासंघर्ष न्यायालयात जाणार असल्याने त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या डावपेचांना कायद्याच्या भाषेत उत्तर देण्याची शिंदे गटानेही तयारी केली असून, त्यांनीही निष्णात वकिलांची फौज उभी केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटामधील संघर्ष शिगेला पोहचला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वादापासून भाजप दूर होती. मात्रशिंदे गट आक्रमक झाल्याने भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्याचे समजते. शुक्रवारी शासकीय सागर बंगल्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेत्यांशी बैठक पार पडली. मुंबई महापालिकेतील जागा वाटपाचा फडणवीस आढावा घेत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी देवेंद्र फडणीस यांनी थेट दिल्ली गाठली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी रात्रभर खलबत करून पुन्हा मुंबईत परतल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील सत्तेपेक्षा मुंबई महापालिका काबीज करण्याचे धोरण आखले. शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा घेऊन त्यादृष्टीने निर्णय घेत असल्याचे समजते.