मुंबई - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे ( MVA Govt Winter Session 2021 ) ३ दिवस पूर्ण झालेले आहेत. पुढील आठवड्यात अजून २ दिवसाचे कामकाज बाकी आहे. परंतु या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर हे सरकार ( Maharashtra State Government ) गंभीर नाही आहे. विशेष करून पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या संदर्भात हे दर ( Petrol Diesel Price Hike ) कमी करण्याबाबत राज्य सरकारला गांभीर्यच नाही आहे. म्हणून अधिवेशनानंतर या विरोधात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला ( Devendra Fadnavis On Petrol Diesel Price ) आहे. दक्षिण मुंबईतील एस बी सोमानी उद्यानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
Devendra Fadnavis On Petrol Diesel Price : पेट्रोल- डिझेल दरवाढ, राज्य सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याचा देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Farmers Suicide In Maharashtra
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ( MVA Govt Winter Session 2021 ) राज्य सरकार ( Maharashtra State Government ) अनेक मुद्द्यांवर गंभीर नाही. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीसंदर्भात ( Petrol Diesel Price Hike ) राज्य सरकारला दर कमी करण्याचं गांभीर्य नाही. त्यामुळेच अधिवेशन संपल्यानंतर याविरोधात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On Petrol Diesel Price ) यांनी दिला. मुंबईमध्ये ते बोलत होते.
एकीकडे एसटी कामगारांच्या संपावर ( ST Workers Strike ) तोडगा निघत नाही. अशात विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी एसटी कामगारांनी आता विलिनीकरण ( ST Merge State Government ) हा मुद्दा डोक्यातून काढून टाकावा, असं वक्तव्य केल्याने एसटी कामगारांची निराशा झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सरकार अशी भूमिका घेऊ शकली असते की, आम्ही त्यातून काही मधला मार्ग काढतो. पण त्यांनी यावर पूर्णपणे फुली मारली आहे. सरकारच्या काही अडचणी असतील, पण शेवटी या संपूर्ण सत्ताव्यवस्थेत चर्चेतून मार्ग निघतात. दोन पावलं तुम्ही पुढे या, दोन पावलं आम्ही मागे जातो. पण आम्ही करणारच नाही अशी भूमिका सरकारने घेण्याऐवजी, त्यातून अजून काही मार्ग निघू शकतो का? असा प्रयत्न करायला हवा होता. मला वाटतं नक्कीच एसटी कामगारांची निराशा झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.
पेट्रोल - डिझेलच्या दराबाबत राज्य सरकारचे प्रेम बेगडी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात जास्त निराशा आमची पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावर झाली आहे. पेट्रोल- डिझेलचे भाव कमी करण्यासंदर्भात सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. मागे सरकार पक्षातील अनेक लोकं केंद्र सरकारविरुद्ध सायकल मोर्चे काढत होते. माझी आता अशी अपेक्षा आहे की, त्यांनी आता राज्य सरकारच्या विरोधात सायकल मोर्चे काढावेत. याचे कारण केंद्र सरकारने दर कमी केल्यानंतर २५ राज्यांनी पेट्रोल- डिझेलचे दर कमी केले. पण स्वतःला पुरोगामी राज्य म्हणणारे सरकार, एक नवा पैसा कमी करायला तयार नाही. म्हणून या विरोधात कालपर्यंत आंदोलन करणाऱ्यांचं प्रेम किती बेगडी होतं हे लक्षात येतंय. बाजूच्या राज्यांपेक्षा पंधरा-पंधरा रुपयांनी जास्त दराने आपणाला पेट्रोल-डिझेल घ्यावे लागत आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे. सरकारने याचा पुनर्विचार करायला हवा. आम्ही या संदर्भामध्ये अधिवेशनानंतर आंदोलन करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील
शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सरकारने संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या ( Farmers Suicide In Maharashtra ) केल्या आहेत. शेतकऱ्यांना मिळणारी मदत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. अनेक वेळा छोट्या छोट्या कारणाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीसाठी अपात्र केलं जातं. ते योग्य नाही. तात्काळ निर्णय घेऊन आठवड्यात किंवा पंधरा दिवसात त्यांना मदत केली पाहिजे. या बाबतीत थोडी सौम्य भूमिका ही सरकारने घ्यायला पाहिजे. पण या सरकार मध्ये कोणी गंभीरच नाही, असा टोमणा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.