मुंबई -विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली. माझी कोरोनी चाचणी पॉझिटिव्ह आली असून सद्या होम आयसोलेशनमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? -माझी कोरोनी चाचणी पॉझिटिव्ह आली असून सद्या होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असेही ते म्हणाले.
सोलापूर दौरा अर्धवट -विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. पण त्यांची प्रकृती बिघडल्याने ते सोलापूर दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. यात त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याना कोरोनाची लागल झाली असल्याची माहिती ट्विट करून दिली. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करण्याचे आवाहन केले.
याआधीही कोरोनाची लागण - विरोधीपक्ष नेते यांना कोरोनाची लागण झाली तर सरकारी कार्यालयात उपचार घेईल, असे म्हणाले होते. मागील वेळी ऑक्टोबर 2020 मध्ये जेव्हा कोरोनाची लागण झाली, तेव्हा त्यांनी मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णलयात 12 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना सुट्टी झाली होती. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याने जोरदार चर्चा झाली होती.
हेही वाचा -World Environment Day 2022: जागतिक पर्यावरण दिन; वाचा सविस्तर