नागपूर कांजूरमार्गाची जागा मेट्रो थ्रीसाठी ( Metro 3 ) योग्य नाही, तर आरए कारशेडमध्येच ( Aarey Car Shed ) योग्य आहे, असा अहवाल भाजप सरकारच्या काळातील कमिटीने दिला आहे. तोच उद्धव ठाकरे सरकार असतानासुद्धा दिला. पण, केवळ इगोपोटो तो प्रकल्प कांजूरमार्गाला नेण्याचे काम केले. पण, उद्धव ठाकरे ( Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray ) यांच्या इगोसासाठी जनतेचे हजारो कोटी वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी चढवला आहे.
हाय लेव्हल एसी एस सौवनिकअहवालकांजूरमार्गची जागा मेट्रो थ्रीसाठी योग्य नाही, यासंदर्भात अहवाल भाजपचे सरकार असताना दिला. त्यासोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नियुक्त केलेल्या हाय लेव्हल एसी एस सौवनिक यांच्या हाय लेवल कमिटीचा तोच अहवाल दिला. त्या अहवालानुसार मेट्रो कारशेड आरेमध्येच योग्य आहे. तो कांजूरमार्गमध्ये नेल्यास त्याच्या उभारणीत जनतेचा प्रचंड खर्च वाढेल. आणि चार वर्षांचा विलंब होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे तो प्रकल्प कंजूरमार्गला नेण्यात आला होता. पण, त्यांच्या इगोसाठी जनतेचे हजारो कोटी वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणाविस यांनीच निशाणा साधला.