मुंबई- चार राज्यात भाजपला बहुमत ( Election Victory In Four State ) मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात 2024ला सत्ता ( Devendra Fadnavis On Maharashtra Government ) बदल अटळ आहे, असे सुतोवाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आज विधानभवनात केले. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या मुंबई मनपाला ( Devendra Fadnavis On BMC Corruption) येत्या निवडणुकीत बाहेर काढू, ठाम विश्वास ही व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप कार्यालय ते विधानभवन रॅली काढण्यात आली. यानंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -
आजच्या निकालाने आम्ही भारावून गेलो नाही. उलट सर्वसामान्य घटकांसाठी काम करण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. उद्यापासून आम्ही राज्यभरात कामाला लागू, असे फडणवीस म्हणाले. सत्ता परिवर्तन 2024ला अटळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख केला. केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जातो आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत फडणवीस यांना छेडले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही बेकायदेशीर काम करत नाहीत. परंतु काही जण पराचा कावळा करतात, असे फडणवीस यांनी सांगताना 2024 ला राज्यात सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट केले. तसेच मुंबई महानगर पालिका भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे. तिला बाहेर काढण्याचे काम भाजप करेल, असा विश्वास व्यक्त केला.