महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सध्याच्या राजकीय घडामोडीत फडणवीस यांचा सागर बंगला बनला सत्तास्थापनेचा केंद्रबिंदू

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झालेल असताना, दुसरीकडे नवीन सत्ता स्थापनेसाठी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा शासकीय निवासस्थान असलेला सागर बंगला सत्ता स्थापनेचा केंद्रबिंदू बनला आहे. दिवसभर भाजप नेत्यांची वर्दळ येथे पाहायला मिळाली.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 25, 2022, 8:21 AM IST

मुंबई - मी पुन्हा येईन, असे सांगून 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून येऊनही राज्यात सरकार स्थापन करू न शकलेल्या भाजप पक्षाला आता नवीन संधी आली आहे. विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सध्या राज्याच्या राजकारणात नंबर एकचे नेते मानले जातात. याच महिन्यात झालेल्या राज्यसभा व विधानसभेच्या निवडणुकीत चमत्कार त्यांनी करून दाखवत त्यांचे खासदार व आमदार निवडून आणले. या चमत्काराच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या नाही तर देशाच्या राजकीय वातावरणात त्यांची उंची वाढलेली आहे. अशामध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांची बंडखोर सेना एकत्र येऊन नवीन सत्ता स्थापन करू शकतात. या अनुषंगाने त्यांचा शासकीय निवासस्थान असलेला सागर बंगला आता राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

शनिवारी (दि. 24 जून) दिवसभर त्यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांची ये जा सुरू होती. विशेष म्हणजे दिल्लीदरबारी गेलेले देवेंद्र फडवणीस दुसऱ्या दिवशीच सकाळी पुन्हा दिल्लीहून परतले. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर हे सागर या निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ आमदार प्रणय फुके, रत्नाकर गोटे, महेश बालदी, विकास कुंभारे, राहुल आहेर, प्रसाद लाड, महेश बालदी, प्रशांत ठाकूर, नितेश राणे हे सुद्धा उपस्थित झाले. त्याचबरोबर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार अनिल बोंडे, खासदार उदयनराजे भोसले हेसुद्धा देवेंद्र फडवणीस यांची भेट घेण्यासाठी सागर या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. एकीकडे सागर या निवासस्थानी राजकीय खलबते सुरू असताना दुसरीकडे गुवाहाटी येथील प्रत्येक घडामोडीची चर्चा या ठिकाणी होत होती.

सध्या वेट अँड वॉच? -दिवसभर सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचे समजते. तरीही आता सर्वस्वी निर्णय जोपर्यंत बंडखोर नेते एकनाथ शिंदे समर्थकांचे पत्र घेऊन राज्यपालांची भेट घेत नाहीत तोपर्यंत तरी सध्या 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेण्याचे ठरले असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे एकीकडे गुवाहाटी येथे गेलेले सेनेचे आमदार राज्यात परत आल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल व त्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, यावरही चर्चा झाल्याचे समजते.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदार हाजिर हो..!, अपात्रतेच्या सुनावणीसाठी 48 तासांत म्हणणे मांडण्याच्या सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details