महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Reply Sharad Pawar : शरद पवारांवर केलेल्या ट्विटवर फडणवीस म्हणाले, त्यावर आलेले उत्तर... - देवेंद्र फडणवीस मराठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP president Sharad Pawar ) यांच्याबाबत केलेल्या ट्विटवरती आपण कायम आहे. त्यावर आलेले उत्तरच बोलके आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली ( Devendra Fadnavis Reply Sharad Pawar ) आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Apr 15, 2022, 7:23 PM IST

Updated : Apr 15, 2022, 8:02 PM IST

मुंबई -श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांचा अभिनंदन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, कृपाशंकर सिंह स्वामी परमात्मानंद सरस्वतीजी महाराज देखील उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सनातन धर्माची परंपरा पुढे नेण्याचे काम, हे संत महंत करत आहेत. त्याचबरोबर काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या ट्विटवरती आपण कायम असून, त्यावर आलेले उत्तरच बोलके आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली ( Devendra Fadnavis Reply Sharad Pawar ) आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सर्व संतांचे आशीर्वाद मिळाले हे माझे भाग्य आहे. आपल्या संस्कृतीने नेहमीच धर्माचा आचरणाशी संबंध जोडला आहे. धर्मसत्तेचे महत्त्व आपण नेहमीच पाहिले आहे. आज आपण विचारांची शुद्धता हरवून बसल्याने यातूनच ती परत आणण्याचे काम केले जाते.

देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना

सनातन धर्म मजबूत आहे कारण तो पवित्र आहे. भारतावर अनेक हल्ले झाले, पण सनातन धर्मावर कोणी आक्रमण करू शकले नाही. धर्माची स्थापना ही शरमेची किंवा लज्जेची नसून अभिमानाची बाब आहे. जो भारतात राहतो त्याचा डीएनए एक आहे. आपण सर्व एकाच वारशाचे, एकाच सभ्यतेशी संबंध ठेवतो. एक मोठी परंपरा आपण पाळत आहोत. ही परंपरा पुढे नेण्याचे आमचे काम संत करत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

मतांसाठी लांगुल चालन -पूर्वी मतांच्या राजकारणासाठी काही जण लपून छपून मंदिरात जात असत. परंतु, देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि धर्मनिरपेक्ष भारत बघायला भेटत आहे. आता सोनिया गांधी ही मंदिरात जात आहेत. अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा पठण करत आहेत. ममता बॅनर्जी धार्मिक झाल्या आहेत, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या धर्मनिपेक्षतेच्या वक्तव्यावर टोमणा लगावला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबात केलेल्या ट्विटवर कायम आहे. त्यावरती आलेल्या प्रतिक्रिया या सर्व काही सांगून जातात. लोडशेडिंगसाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचेही, फडणवीस यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut Allegation : INS विक्रांत नंतर सोमय्यांची आता 'टॉयलेट एक लव्ह स्टोरी'

Last Updated : Apr 15, 2022, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details