महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis On ED Inquiry : केंद्रीय तपास यंत्रणा कधीही चुकीची कारवाई करणार नाही - देवेंद्र फडणवीस - ईडी कारवाई देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कुटुंबियांवर केंद्रीय तपास ( ED Inquiry By MVA Leaders ) यंत्रणांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. या आरोपांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On MVA Leaders ED Inquiry ) यांनी आज जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis On ED Inquiry
Devendra Fadnavis On ED Inquiry

By

Published : Mar 23, 2022, 7:18 PM IST

नागपूर - केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कुटुंबियांवर केंद्रीय तपास ( ED Inquiry By MVA Leaders ) यंत्रणांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. या आरोपांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On MVA Leaders ED Inquiry ) यांनी आज जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राज्य सरकारचे मंत्रीच वकीलांसोबत बसून भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी षड्यंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते आज नागपुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता विमानतळावर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.

मोदी कधीही सुडाचे राजकारण करत नाही - फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडी कडून कारवाई झाल्यानंतर आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा पेटलेला आहे. केंद्र सरकारकडून सत्तात्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असून सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही सुडाचे राजकारण करत नाही. उलट राज्य सरकारचे मंत्रीच भाजप नेत्यांना किरकोळ प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी वकिलांसोबत बसून षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कोणत्याही सरकारने चुकीची कारवाई करू नये - केंद्र सरकार असो की राज्य सरकार, कोणीही विनाकारण चुकीची कारवाई करू नये. मी विश्वासाने सांगू शकतो की केंद्रातील मोदी सरकार कधीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून चुकीची कारवाई करणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हेही वाचा -Government's Reply : फौजदारी कायद्यातील सुधारणांची प्रक्रिया सुरू: गृह मंत्रालय

ABOUT THE AUTHOR

...view details