मुंबई - महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज केले. होते. याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता ते म्हणाले, याबद्दल मी अजून काहीही ऐकले नाही. फडणवीस हे आज नवी दिल्लीत होते.
नारायण राणेंचे भाकीत मी ऐकले नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज केले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आम्ही दिल्लीला आलो आहोत. नारायण राणे यांनी आज काय भाकीत केले ते मी ऐकले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- जयपूर दौऱ्यादरम्यान काय म्हणाले मंत्री राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडमोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही. मात्र, मार्चपर्यंत तेथे भाजपचे सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर अपेक्षित बदल दिसून येतील. सरकार पाडणे आणि स्थापन करणे हे गुपित असून ते माझ्यात आहे, मला ते बाहेर काढायचे नाही, असेही केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.