महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis: आता जोरदार बॅटिंग, टेस्ट मॅच नाहीतर ट्वेंटी-ट्वेंटी - देवेंद्र फडणवीस - मोदी सरकार

मुंबईत भाजपने आयोजित केलेल्या २०२२ गणेशोत्सव सार्वजनिक स्पर्धेचा ( Mumbai BJP Ganeshotsav Competitions ) पारितोषिक वितरण सोहळा ( Prize Distribution Ceremony ) मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे पार पडला. सध्या मुंबईत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मुंबईतील २ कोटी जनता दखल घेत आहे. मोदी सरकारने ( Modi Government ) सर्वांना जागे केले असून, आता कोणी झोपत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 21, 2022, 10:06 AM IST

मुंबई :मुंबईत भाजपने आयोजित केलेल्या २०२२ गणेशोत्सव सार्वजनिक स्पर्धेचा ( Mumbai BJP Ganeshotsav Competitions ) पारितोषिक वितरण सोहळा ( Prize Distribution Ceremony ) मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे पार पडला. याप्रसंगी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जोरदार बॅटिंग करत आता टेस्ट मॅच नाही तर ट्वेंटी-ट्वेंटी खेळायच आहे, असं सांगत विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच यापुढे सर्वच हिंदूंचे सण जोरदार होतील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


या सरकारची सुरुवातच गणेशोत्सवाने :याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी ३ सप्टेंबर १८९५ रोजी आपल्या अग्रलेखामध्ये म्हणजे १२७ वर्षांपूर्वी असे म्हटले होते की, वर्षातून १० प्रांतातून सर्व हिंदू लोकांनी एका देवतेच्या उपासनेत गडून गेलेले असावे. ही साधी गोष्ट नाही आहे. हे फार महत्त्वाचे आहे आता उभ्या देशात सर्व राज्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. तसेच यापुढे ते म्हणाले की, मी सांगू इच्छितो की, या नवीन सरकारची सुरुवातच श्री गणेशापासून झाली असून आता आम्हाला कोण थांबवणार नाही. मुंबईत महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं विसर्जन यंदा व्हायला पाहिजे अशी प्रार्थना मी गिरगाव चौपाटीला गणपती विसर्जनाच्या दरम्यान केली, असेही त्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले. कारण सध्या मुंबईत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मुंबईतील २ कोटी जनता दखल घेत आहे. मोदी सरकारने सर्वांना जागे केले असून, आता कोणी झोपत नाही.


गणेशोत्सवात मराठी माणसाला टॉनिक देण्याचे काम : महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण हे पूर्णतः भ्रम निर्माण करणार आहे. यंदा गणेशोत्सवा मध्ये गणेश मंडळांना आज पारितोषिक वितरण करत असताना त्यांनी सांगितले की, अतिशय उत्तम अशा पद्धतीचे मॅनेजमेंट या गणेशोत्सव मंडळामध्ये दिसून आलं. हा मॅनेजमेंट साठी अतिशय महत्त्वाचा विषय असू शकतो. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा गणेशभक्त आहे व वर्षातून एकदा गणेशोत्सव साजरा करताना तो मराठी माणसाला वर्षभराचा टॉनिक देऊन जातो. कोकणातील माणूस, चाकरमानी वर्षातून एकदा कोकणात जातच असतो. आपल्या भारताचे नाव सुद्धा गणेशोत्सवामुळे जगामध्ये मोठ झालेल आहे.

मागच्या सरकारने बंदी घातली :याप्रसंगी बोलताना पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या सरकारने गणेशोत्सवाला परवानगी नाकारली व ते गुजरातच्या खाली गेले. परंतु महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम हे सरकार करेल असेही देवेंद्र म्हणाले. गणेशोत्सव बदलला आहे पण भावना बदलली नाही असेही ते म्हणाले.


काय ती गर्दी, काय तो जल्लोष, सर्व ओके :काय ती गर्दी, काय तो जल्लोष, सर्व ओके मध्ये. जर आज शहाजी बापू इथे असते तर त्यांनी अशा पद्धतीत वर्णन केलं असतं असा मिश्किल टोमणाही याप्रसंगी देवेंद्र फडवणीस यांनी लगावला. मुंबईतील मराठी माणसाच्या सणावर आता कुठलेही निर्बंध येऊ देणार नाही असा पवित्राही त्यांनी याप्रसंगी घेतला. अगोदर दहीहंडी नंतर गणेशोत्सव यानंतर नवरात्री, दसरा, दिवाळी व सर्व सण जोरात होणार असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details