महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis : 'जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा', फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा - मुख्यमंत्री ठाकरे मुंबई सभा

तुमच्या वजनाने बाबरी मशीद पडली असती, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली ( Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis ) होती. त्यावर फडणवीस यांनी 'जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा', असे म्हणत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला ( Devendra Fadnavis Warns CM Thackeray ) आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : May 15, 2022, 9:43 AM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष, राज ठाकरे, संघ परिवार, केंद्रातील मोदी सरकार केतकी चिखली भाजपसह विरोधकांचा समाचार घेतला. विशेष करून मुख्यमंत्र्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर झहरी टीका केली ( Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis ) आहे. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिला ( Devendra Fadnavis Warns CM Thackeray ) आहे. उद्या मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत ( Devendra Fadnavis Rally ) आहे.


काय आहे ट्विट मध्ये? :मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर त्या सभेला उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, 'सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम.. अरे छट हा तर निघाला.. आणखी एक टोमणे बॉम्ब.. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा!', अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट


मुख्यमंत्र्यांनी उडवली फडणवीसांची खिल्ली :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत ( CM Thackeray Mumbai Rally ) अपेक्षित असल्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडताना तेथे होतो, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करत जोरदार खिल्ली उडवली आहे. बाबरी पाडली तेव्हा मी, होतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना, ती तुमच्या काय शाळेची सहल होती काय? तुमचे वय काय, तुम्ही बोलता किती. तुम्ही खरंच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता, तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


नांदगावकरांचेही ट्विट :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरी टीका केली आहे. त्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. ते म्हणालेत की, "शिवाजी पार्क सेनेचा अनभिषिक्त सम्राट, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू जननायक माननीय राज साहेब ठाकरे. बाकी सगळे.... जय हिंद, जय महाराष्ट्र."

हेही वाचा : तुमच्या वजनाने बाबरी मशीद पडली असती, मुख्यमंत्र्यांची फडणवीसांवर खोचक टीका

ABOUT THE AUTHOR

...view details