महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...यामुळे आमचा पाचवा उमेदवार निवडून देईल - देवेंद्र फडणवीस - ताज हॉटेल

विधानपरिषद निवडणुकीच्या ( MLC Election 2022 ) पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 18 जून) मुंबईत भाजपाच्या सर्व आमदारांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या. या बैठकीला भाजप आणि मित्रपक्षांचे आमदारही उपस्थित होते. आपले आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले आहे. सर्वात जास्त आमदार असलेल्या भाजपनेही आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ठेवले आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 19, 2022, 6:45 AM IST

मुंबई- विधानपरिषद निवडणुकीच्या ( MLC Election 2022 ) पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 18 जून) मुंबईत भाजपाच्या सर्व आमदारांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या. या बैठकीला भाजप आणि मित्रपक्षांचे आमदारही उपस्थित होते. आपले आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले आहे. सर्वात जास्त आमदार असलेल्या भाजपनेही आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांसोबत शनिवारी (दि. 18 जून) देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांची बैठक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

बोलताना देवेंद्र फडणवीस
आघाडीतील नाराजीचा भाजप घेणार फायदा -यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "आमचा प्रयत्न आहे की आमचा पाचवा उमेदवार निवडून आला पाहिजे, त्या संदर्भात आमची बैठक होती. त्यासाठी लागणाऱ्या मतांची सर्व जुळवाजुळवही झालेली आहे. महाविकास आघाडीत असंतोष आहे. तो असंतोष डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही हा पाचवा उमेदवार उभा केलेला आहे. या पाचव्या उमेदवारांमुळे या तीनही पक्षांमधील नाराजीला वाट मिळेल आणि त्यातूनच आमचा पाच उमेदवार निवडून येईल", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.नाराजी लपून राहिलेली नाही - पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या तीनही पक्षांमध्ये खदखद आहेच. यासंदर्भात तुम्हीच चालवलेल्या बातम्या मी पाहिल्या आहेत. इथे कोणाचाच कोणावर विश्वास नाही. तीनही पक्ष एकमेकांचे आमदार फोडण्यासाठी फोनाफोनी करतायत तसे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि अगदी टोकाचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे कुठेतरी आपलाच उमेदवार कसा निवडून नये याच्यासाठी हे सर्व जण प्रयत्न करत आहेत. त्यांच्या याच नाराजीतून आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल." असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details