महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis : जीर्ण इमारतींना नोटीस न दिल्यास...; उपमुख्यमंत्र्यांचा सहाय्यक आयुक्तांना थेट इशारा

पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना ( Building Collapse In Rain ) घडतात. जीर्ण व जर्जर झालेल्या इमारतीला नोटीस न दिल्यास थेट सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Jul 1, 2022, 9:17 PM IST

मुंबई -पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना ( Building Collapse In Rain ) घडतात. जीर्ण व जर्जर झालेल्या इमारतीला नोटीस न दिल्यास थेट सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

मुंबई मध्ये पावसाळा सुरू झाला की धोकादायक असलेल्या इमारती कोसळतात. प्रत्येक वॉर्ड मध्ये अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना समजतील, अशा भाषेत नोटीस पाठवून त्या खाली केल्या पाहिजेत. जे वॉर्ड ऑफीसर ही कार्यवाही करणार नाहीत, त्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, तात्पुरत्या निवाऱ्याची काही सोय करता येते का हे पाहिले पाहिजे. तारण लोक घरं सोडत नाही. केवळ पावसाळ्या दरम्यान त्यांनी काही काळासाठी या घरात घरात राहावेत, असा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने काय उपाययोजना केल्या. डोंगराळ भागात वर्षानुवर्षे दरडी कोसळणाऱ्या ठराविक ठिकाणांचे सर्वेक्षण झालेले आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नव्याने दरडी कोसळणारी ठिकाणे देखील असू शकतात. याचे सर्वेक्षण होणे, अत्यंत आवश्यक असल्याने ते सर्वेक्षण करण्याचे तत्काळ निर्देश आपत्कालीन यंत्रणांना दिले आहेत, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले.

हेही वाचा -Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details