मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज बैठक घेऊन अधिवेशनाबाबतची आपली रणनीती ( Strategy for Maharashtra assembly ) स्पष्ट केली. मात्र, यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अन्य नेत्यांना आणि प्रश्नांनाही बगल ( Devendra Fadnavis press conference ) दिली.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज मुंबईत बैठक घेतली. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यासपीठावर असलेल्या विरोधी पक्षातील घटक पक्षांची भूमिका आणि अधिवेशनाबाबत रणनीती स्पष्ट ( Devendra Fadnavis on Maharashtra assembly session ) केली. सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेणार आणि जाब विचारणार याची त्यांनी पुन्हा एकदा उजळणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणाबाबत तसेच शेतकऱ्यांबाबत असलेल्या उदासीनतेबाबत आणि वीजग्राहकांना भारनियमनाला सामोरे जावे लागण्याच्या भीतीबाबत त्यांनी जाब विचारणार ( Mahavikas Aghadi corruption ) असल्याचे सांगितले.
हेही वाचा-Nitesh Rane On Disha Salian : पोलिसांच्या नोटिसीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'दिशाला न्याय मिळावा...'
Devendra Fadnavis on Maharashtra assembly session : देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझी पत्रकार परिषद, मीच बोलणार! - विरोधी पक्षनेते पत्रकार परिषद
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज मुंबईत बैठक घेतली. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यासपीठावर असलेल्या विरोधी पक्षातील घटक पक्षांची भूमिका आणि अधिवेशनाबाबत रणनीती स्पष्ट केली. सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेणार आणि जाब विचारणार याची त्यांनी पुन्हा एकदा उजळणी के
पत्रकार परिषदेत फक्त मीच बोलणार- फडणवीस
व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विखे पाटील, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रिपाईचे नेते अविनाश महातेकर, भाजपा नेते आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा व प्रवीण दरेकर उपस्थित होते. मात्र, यापैकी कोणीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चला सरकार पडणार असा दावा केला होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ही माझी पत्रकार परिषद आहे, त्यामुळे मीच बोलणार अशी अजब भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या प्रश्नावर उत्तर देण्याची इच्छा असून बोलता न आल्याची खंत चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यामुळे सरकार पडणार हा विरोधकांचा दावा पुन्हा एकदा फोल ठरणार, हेच देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले. तर फडणवीस यांनी अन्य नेत्यांना का बोलू दिले नाही ? याबाबतही आता चर्चा सुरू आहे.