मुंबईकेंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister Amit Shah) भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा (Amit Shah) ५ सप्टेंबर रोजी लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर (Amit Shah Mumbai Visit) येत आहेत. परंतु, निम्मित जरी बाप्पाच्या दर्शनाचे असले, तरी या दौऱ्यात शहांनी वेळ द्यावा अशी विनंती उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून करण्यात आली आहे. यावर बोलताना या दौऱ्यात राजकीय चर्चा (Political talk on Visit) होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन (Darshan of Lalbagh Ganesh) घेण्याबरोबरच शहा मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai BJP President) आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या घरी भेट देणार आहेत. विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही घडामोडी सुरू आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेली मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) बघता अमित शहा यांच्या या दौऱ्यात राजकीय खलबत (Political upheaval during Shah visit) होणार याद काही शंका नाही. कारण, अमित शहा यांनी या दौऱ्यात काही वेळ चर्चेसाठी आम्हाला द्यावा अशी विनंतीही भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.