महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri East by election अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निवडणूक ( NCP President Sharad Pawar ) बिनविरोध व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray on Andheri by election ) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक ( Shiv Sena MLA Pratap Sarnaik ) यांनी आवाहन केले आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 17, 2022, 9:28 AM IST

मुंबई- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध देत भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार मागे घ्यावा का? या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार मुरजी पटेल हे उपस्थित होते.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निवडणूक ( NCP President Sharad Pawar ) बिनविरोध व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray on Andheri by election ) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक ( Shiv Sena MLA Pratap Sarnaik ) यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती दाखवत ही निवडणूक बिनविरोध घ्यावी का, याबाबत या बैठकीत रात्री चर्चा करण्यात आली. मात्र याबाबत अद्याप भारतीय जनता पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ( BJP meeting over Andheri East by election ) नेमका काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे.



आशिष शेलार निवडणुक लढवण्यावर ठामदेवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांना आहे. तसेच निवडणुकीत उमेदवार देण्याआधी कोणत्याही पक्षांनी प्रस्ताव दिला नव्हता. आता उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. प्रचारही सुरू झाला आहे. मतदारसंघातले वातावरण पाहता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नक्की निवडून येईल, असा विश्वास आशिष शेलार यांना असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला जाऊ नये, असे मत आशिष शेलार यांनी या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर उमेदवार मुरजी पटेल यांनीही आपण निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details