महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Santosh Parab case : सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! देवेंद्र फडणवीसांचा टोला - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांना नितेश राणे यांच्या संदर्भात नोटीस पाठवली आहे. त्यावरुन सध्या यावरुन राज्यात चर्चांना उधाण आले आहे. यावरुन राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे. तसेच सिंधुदुर्ग पोलिसांवर टीका केली आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 30, 2021, 4:52 PM IST

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या संतोष परब मारहाण प्रकरणावरून ( Santosh Parab assault case ) वाद शिगेला पोहोचलेला आहे. विशेष करून केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या अटके संदर्भांमध्ये चर्चा रंगलेल्या आहेत. आता यावर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागावर ताशेरे ओढले आहेत. "सिंधुदुर्ग पोलिसांनी नियम पाळायचे नाहीत असे ठरवलेले दिसते," अशा पद्धतीचे ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चुकीच्या पद्धतीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल करावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

नोटीस कायदेशीर नाही -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतोष परब याला झालेल्या मारहाण प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव समोर आले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. मात्र, नितेश राणे अजून बेपत्ता आहेत. नितेश राणे यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) म्हणाले, "नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगायला मी मूर्ख आहे का?" त्यावरून नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस ( Kankavali police notice ) बजावली होती. नारायण राणे यांना बजावण्यात आलेली नोटीस ही कायदेशीर नाही. असे सांगत ही नोटीस बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर द्वारे केली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गात जो काही प्रकार सुरू आहे ते पाहता सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही असे ठरवलेले दिसते, असे सुद्धा म्हटले आहे.

फडणवीसांच्या ट्विटमध्ये काय आहे?

'सिंधुदुर्ग पोलिसांनी ( Sindhudurg Police ) कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. ….आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल.' असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे
नारायण राणे यांना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये नेमकं काय?
कणकवली पोलिसांनी ( Kankavali police notice ) पाठवलेल्या नोटीसमध्ये नारायण राणे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी हजर राहावं असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर नितेश राणे हे आरोपी असून, त्यांचा शोध लागत नाही. या आरोपीचा शोध जारी आहे. आपण काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी या खटल्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. आरोपी नितेश राणे कुठे आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्ही 'नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख वाटलो का' असं म्हटलं. या विधानावरुन नितेश राणे कुठे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे. त्यामुळे ही नोटीस मिळताच तुम्ही आरोपी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर करा. तसंच या गुन्ह्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी कणकवली पोलिसात २९ डिसेंबरला दुपारी ३ वाजता हजर राहावं असं पोलिसांनी म्हटलं आहे.हेही वाचा -Sharad Pawar On Narendra Modi : पंतप्रधान मोदींची सत्ता स्थापनेची ऑफर ते अजित पवारांचा शपथविधी, शरद पवारांचा मोठा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details