महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 4, 2022, 6:22 PM IST

Updated : Sep 4, 2022, 6:36 PM IST

ETV Bharat / city

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची होणार चौकशी, देवेंद्र फडणवीसांना गृहखात्याला दिले आदेश

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यबाबत चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याला detailed investigations on Cyrus Mistry death दिले. पालघर जिल्ह्यात सायरस मिस्त्री यांचा अपघाती Cyrus Mistry death in accident मृत्यू झाला आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. Cyrus Mistry Death ते टाटा ग्रुपचे माजी चेअरमन होते. Ex chairman of Tata Group Cyrus Mistry त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यबाबत चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याला detailed investigations on Cyrus Mistry death दिले. पालघर जिल्ह्यात सायरस मिस्त्री यांचा अपघाती Cyrus Mistry death in accident मृत्यू झाला आहे.

प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आहे. त्याचबरोबर अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांच्या दरम्यान मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सुर्या नदीच्या पुलावर अपघात झाला आहे. सायरस मिस्त्री यांच्य सह दोन लोक दगावल्याची माहिती समोर आली असून मर्सिडीज गाडी डिव्हायडरला धडकल्याने सदर अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर अपघात-पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोन जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजलीटाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला.सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हेही वाचाCyrus Mistry Death Reaction सायरस मिस्त्रींच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी, राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक

Last Updated : Sep 4, 2022, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details