मुंबई - गेली चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये महाड आणि चीपळून या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. या सर्व परिस्थितीची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पुर परिस्थिबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा - Chief Minister Uddhav Thackeray
पुराच्या परिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या स्थितीबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यामध्ये तांनी पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार नागरिकांना तत्काळ सर्व मदत उपलब्ध करून देईल, असे आश्वासन दिले.
पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे देण्याची गरज
पुराच्या परिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फडणवीस यांनी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार नागरिकांना तत्काळ सर्व मदत उपलब्ध करून देईल, असे आश्वासन दिले. तसेच, पूर परिस्थिवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमचे सरकारला संपूर्ण सहकार्य असेल, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतर भाजप नेते पूरग्रस्त भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे. तसेच, काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ज्यांचे प्राण गेले, त्यांच्याबद्दल संवेदनाही देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केल्या आहेत.