मुंबई -वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अनुदानाची ( GST Paid To State By Central Government ) ८६,९२२ कोटींची रक्कम केंद्र सरकारने काल राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक १४,१४५ कोटी ( GST Paid By Central Government To Maharashtra ) रुपये आले आहेत. केंद्राकडून जीएसटीचा ( Maharashtra GST Amount Pending ) परतावा भेटत नाही. यामुळे वारंवार गळा काढून ओरडणारे राज्य सरकार इंधनाचे दर कमी करत नव्हते. म्हणूनच आता हा जीएसटीचा परतावा आल्यानंतर आता तरी राज्य सरकार इंधन व पेट्रोलचे दर कमी करणार की केंद्रावर दोषारोप हाच पुरुषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार? असा प्रश्न ट्वीटद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
काय आहे ट्वीटमध्ये? -३१ मे २०२२ पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कंपेंसेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की, पुन्हा आज १ जून पासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार. राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची 'ढकलगाडी' करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरुषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार? आता तरी पेट्रोल- डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काल कमी करा! तसेच मुंबई भाजपने सुद्धा याबाबत ट्वीट केले आहे.