महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गदाधारीच्या गप्पाही आहेत गधाधारी, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray

आजकाल 'गदाधारी' हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात. पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते 'गधाधारी' दिसतात. 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुंबईत ते बोलत होते.

गदाधारीच्या गप्पाही आहेत गधाधारी, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
गदाधारीच्या गप्पाही आहेत गधाधारी, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By

Published : Apr 26, 2022, 9:27 PM IST

मुंबई - हल्ली 'गदाधारी' हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात. पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते 'गधाधारी' दिसतात, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुंबईत ते बोलत होते.

अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा - याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या पुस्तकातून अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे. भाजपची वाटचाल आणि त्यात अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अनेक तास ते यावर बोलू शकतात. त्यावर एक पुस्तक त्यांनी लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे.

कुटुंब वत्सल आणि संवेदनशील -पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुटुंबवत्सल आणि संवेदनशील असे अमित शाह यांचे व्यक्तिमत्त्व आहे. ते कितीही कामात असले तरी आपल्या नातीशी वेळ काढून दररोज बोलत असतात. अमित शाह यांची निर्णयक्षमता अतिशय मोठी आहे. स्वतः दौरे करून अभ्यास करायचा आणि निर्णय घ्यायचा, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

मुख्यमंत्र्यांना टोला - आजकाल 'गदाधारी' हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात. पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते 'गधाधारी' दिसतात. परंतु मेहनत, त्याग आणि प्रखर राष्ट्रवाद असे अनेक पैलू अमित शाह यांच्या व्यक्तिमत्वात आहेत असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, अतुल भातखळकर, उदय निरगुडकर, रमेश पतंगे, अनिर्बान गांगुली, शिवानंद द्विवेदी, डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details