महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Criticizes CM : मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्यावे; फडणवीसांची 'त्या' विधानावरून मुख्यमंत्र्यावर टीका - Latest Marathi news 5 January

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी एका बैठकी दरम्यान केलेल्या विधानावरून टिका ( Devendra Fadnavis criticizes CM ) केली आहे. भाजप नेते फडणवीस म्हटले की, टिकेकडे लक्ष न देता महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्यावे. रात्रीच्या अंधारात काळे कायदे पास केले जातात, त्याकडे लक्ष द्यावे, असे सांगत असे सरकार यापूर्वी कधीच बघितले नाही तसेच हे सरकार पळपुटे आहे, असेही म्हटले आहे.

Devendra Fadnavis criticizes CM
फडणवीसांची 'त्या' विधानांवरून मुख्यमंत्र्यावर टीका

By

Published : Jan 5, 2022, 7:52 PM IST

Updated : Jan 5, 2022, 8:01 PM IST

मुंबई -२०२२ ह्या नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि या वर्षी देशात होणाऱ्या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यामध्ये उत्तर प्रदेश राज्य हे महत्त्वाचे राज्य असून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या प्रचारात आता महाराष्ट्रातील उत्तर भारतीय भाजप कार्यकर्ते सुद्धा सक्रिय होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी एका बैठकी दरम्यान केलेल्या विधानावरून टिका ( opposition leader Devendra Fadnavis on Uddhav Thackeray ) केली आहे. भाजप नेते फडणवीस म्हटले की, टिकेकडे लक्ष न देता महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्यावे. रात्रीच्या अंधारात काळे कायदे पास केले जातात, त्याकडे लक्ष द्यावे, असे सांगत असे सरकार यापूर्वी कधीच बघितले नाही तसेच हे सरकार पळपुटे आहे, असेही म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातील १२५ कार्यकर्ते -

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण तयारीला लागली असून महाराष्ट्रातूनही या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची एक फौज उत्तर प्रदेश मध्ये जाणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमांमध्ये या कार्यकर्त्यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की उत्तर प्रदेश मध्ये मागची ७ वर्षे पंतप्रधान मोदीजी व ५ वर्ष मुख्यमंत्री योगीजी सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. त्या विकासाच्या जोरावरच तिथली जनता पुन्हा भरघोस मतांनी आम्हाला विजयी करेल असा आत्मविश्वास आम्हाला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये अशी परंपरा राहिलेली आहे की ज्या राज्यात निवडणूक असेल तिथे इतर राज्यातील कार्यकर्ते जाऊन त्या निवडणुकीमध्ये सहकार्य करत असतात. त्याच अनुषंगाने उत्तर भारतीय महाराष्ट्र मोर्चाचे १२५ कार्यकर्ते हे उत्तर प्रदेशमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. तिथे जाऊन तिथले पदाधिकारी त्यांना जे काही काम सांगतील त्या पद्धतीने ते काम करतील. वास्तविक याची आवश्यकता नाही आहे. परंतु, पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी यांच्या नेतृत्वात या निवडणुकीमध्ये जो काही मोठा विजय आम्ही संपादन करणार आहोत या विजयामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा थोडासा वाटा असेल याचा आम्हाला आनंद आहे.

उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातील १२५ कार्यकर्ते

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्यावे - देवेंद्र फडणवीस

मागील दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रालयात फिरकले नाही आहेत. त्याच बरोबर ते मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा अनुपस्थित राहिले. तर आत्ता मुंबई महानगरपालिका निवडणूक तसेच मुंबईतील विविध समस्या बाबत काल त्यांनी शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक केली. या बैठकीमध्ये विरोधक भाजपा आमच्यावर टीका करत असल्याचा सूर कार्यकर्त्यांकडून लगावण्यात आला. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना टिकेकडे लक्ष न देता जनतेची काम करत रहा असा सल्ला दिला होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी या बैठकी बाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी टिकेकडे लक्ष न देता महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्यावे. रात्रीच्या अंधारात काळे कायदे पास केले जातात, त्याकडे लक्ष द्यावे, असं सांगत असे सरकार यापूर्वी कधीच बघितलं नाही तसेच हे सरकार पळपुटे आहे, असेही म्हटले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्यावर होणाऱ्या टीकेसंबंधी भाष्य केलं. “मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत असून या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो,” असे उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

हेही वाचा -C M Uddhav Thackeray : विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर ; माझ्यावर झालेल्या टीकेला मी शांतपणे घेतो

Last Updated : Jan 5, 2022, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details