मुंबई : आज सामनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत प्रकाशित करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सविस्तर मुलाखत आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तर या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहत असतो. खरी मॅच पाहत असतो. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची?, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची फडणवीसांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'मी फिक्स मॅच बघतच नाही' - देवेंद्र फडणवीसांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत प्रकाशित करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सविस्तर मुलाखत आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तर या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
अजित पवारांच्या आरोपांना उत्तर - छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचा निधी रोखल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यावरही फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी संभाजी महाराजांच्या समाधी संबंधित कामांवर स्थगिती दिल्याचा आरोप केला आहे. या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. दादांसारख्या व्यक्तीने तरी असा आरोप करताना फाईलवर काय लिहिलंय हे पाहिलं पाहिजे. मी स्वत: माझ्या हस्ताक्षरात लिहिलंय की या कामाला स्थगिती देणे योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामे घेतली त्याचे सादरीकरण माझ्या आणि मुख्यमंत्र्यांसमोर करावे. त्यात काही काम राहिली असतील तर तीही घेतली जाईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
TAGGED:
uddhav thackeray interview