मुंबई -पेट्रोल व डिझेलवरील ( Centre vs State Government ) किमतीवरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये सुरू झालेली तू तू मै मै, संपता संपत नाही आहे. राज्यातील जीएसटीचे पैसे ( Maharashtra GST Pending ) केंद्राने सरकारला दिले नाही, या कारणाने राज्य सरकारने केंद्र सरकारवर ठपका ठेवलेला आहे. दुसरीकडे या जीएसटीच्या पैशाचा काही संबंध पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol Disel Price Hike ) किमतीशी नसल्याचे सांगत सरकारने यावरील कर त्वरित कमी करावा व ही बहाणेबाजी बंद करावी, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस ( Devendra Fadnavis Criticized MVA Government ) यांनी दिला आहे.
'राज्य सरकारने १ लाख २० कोटी रुपये कमावले' -राज्यसरकारचा दृष्टिकोन अतिशय सुष्म आहे. शॉर्ट साईड असा प्रकार सरकार बघत आहे. या सरकारला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पूर्णतः उघडे पाडले आहे. या सरकारने पेट्रोल-डिझेलच्या करातून १ लाख २० हजार कोटी कमावले आणि आता मात्र दर कमी करण्याची वेळ आली, त्यावेळी चुकीच्या पद्धतीने हे सरकार वागत आहे. या ठिकाणी निरनिराळे बहाने केले जात आहेत. कहाण्या सांगितल्या जात आहेत, असा आरोप देवेंद्र फडवणीस यांनी केला आहे.