महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'अनियमितता असेल तर कारवाई व्हावी; पण, सिडकोचा थेट संबंध मुख्यमंत्र्यांशी नसतो'

सिडको ही स्वायत्त आहे. बोर्ड आणि अधिकारी या संबंधीचे निर्णय घेतात. त्यामुळे हा रिपोर्ट पब्लिक अकाऊंट कमिटीकडे जाईल आणि त्यानुसार कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Mar 4, 2020, 5:22 PM IST

Updated : Mar 4, 2020, 6:24 PM IST

मुंबई- 'कॅग'चा अहवाल प्राप्त झाला असून एप्रिल 2013 ते मार्च 2018 पर्यंतच्या कामांचा हा अहवाल आहे. यात मुंबई मेट्रो, नेरुळ उरण रेल्वे आणि नवी मुंबई विमानतळ या संदर्भाच्या बाबी त्यांनी निदर्शनास आणल्या आहेत. यात मुंबई मेट्रो आणि नवी मुंबई विमानतळाबाबतचे निर्णय 2014 पूर्वीचे आहेत. त्यासंबंधी आक्षेप नोंदवण्यात आला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॅगच्या अहवालावर दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सर्व टेंडर हे सप्टेंबर 2014 चे आहेत. तसेच स्वप्नपूर्ती या स्कीमच्या टेंडरचे वाटप उशिरा का झाले, याबद्दल आक्षेप आहे. 2013 पूर्वी या स्कीमसाठी कोणतेही टेंडर न बोलावता काम देण्यात आले होते. या अहवालामध्ये नंतरचा भाग आला असून, आधीचा भाग बाहेर आला नाही आणि तो का आला नाही हेदेखील पाहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा अहवाल येण्याआधीच त्याचा काही भाग लिक करण्यात आला आहे. यात ज्या प्रोजेक्टसंदर्भात अनियमितता सांगितली जाते, ते 2014 चे प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सिडको ही स्वायत्त आहे, बोर्ड आणि अधिकारी या संबंधीचे निर्णय घेतात. त्यामुळे हा अहवाल पब्लिक अकाऊंट कमिटीकडे जाईल आणि त्यानुसार कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले. सिडको पूर्ण स्वायत्त असल्याने त्याचे फक्त लेखेच समोर आले आहेत. अनियमितता झाली असेल, तर कारवाई झाली पाहिजे. पण, सिडकोचा थेट संबंध मुख्यमंत्र्यांशी येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांनी मिळून कोरोनाशी लढण्याची गरज

कोरोनामुळे गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातदेखील गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ सरकार नाही, तर सर्वांनी मिळून याच्याशी लढण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपला कोरोना झाला असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती. त्यावर, अशोक चव्हाणांनाच कोरोना व्हायरस झाला असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

हेही वाचा -

..म्हणून अरविंद केजरीवालही खेळणार नाहीत होळी

तालिबानच्या हल्ल्यात अफगाणिस्ताचे २० जवान ठार; शांतता करारावर प्रश्नचिन्ह

Last Updated : Mar 4, 2020, 6:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details