महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फडणवीस, पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले- अतुल लोंढे - Atul Londhe on chandrakant patil

काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लोंढे यांनी म्हटले आहे.

atul londhe
अतुल लोंढे

By

Published : Oct 19, 2021, 7:36 PM IST

मुंबई -अशोक चव्हाण यांच्या ईडी चौकशीचे संकेत देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका त्यांनी केली आहे.

भाजपचे नेते काहीही बरळत आहेत - अतुल लोंढे

काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ईडीच्या रडारवर पुढील नेते हे अशोक चव्हाण असतील अशा पद्धतीचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नांदेडमध्ये बोलताना दिले होते. आपण ईडीचे अधिकारी नाही. मात्र, पुढील नेते चव्हाण असतील असं सुतोवाच त्यांनी केलं होतं. पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना लोंढे यांनी फडणवीस आणि पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली आहे. नांदेड येथील देगलूरच्या पोटनिवडणुकीत पराभव अटळ असल्याने हे नेते काहीही बरळत आहेत, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती, पवार-ठाकरे बैठकीत खलबते..

ABOUT THE AUTHOR

...view details